एस पी एम मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह संपन्न
एस पी एम पॉलिटेक्निक कुमठे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा क्रीडा सप्ताह 2 जानेवारी पासून 4 जानेवारी पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग लक्षणीय ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका सौ प्रियाताई माने यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वातीताई माने व प्राचार्या रोहिणी चव्हाण उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी विद्यार्थ्यांना क्रीडे मध्ये सहभाग घेण्याचे महत्त्व पटवून दिले व सांगितले की क्रीडा म्हणजे केवळ खेळ नसून ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. क्रीडेमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मनोबल उंचावते आणि जीवनात शिस्त व आत्मविश्वास निर्माण होतो. संघटित खेळांमुळे संघभावना, सहकार्य, नेतृत्वगुण यांचा विकास होतो. खेळामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो आणि मन:शांती लाभते.
क्रीडेमुळे विद्यार्थी वयात सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. निरोगी शरीरात निरोगी मन असते, असे म्हणतात, आणि हे क्रीडेमुळे साध्य होते. याशिवाय, क्रीडा हा मनोरंजनाचा, मैत्रीचा, आणि सामाजिक संवादाचा एक उत्तम मार्ग आहे.
या क्रीडा सप्ताहात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, हॉलीबॉल, बॅडमिंटन इत्यादी खेळांचा समावेश होता.
क्रिकेट- अंतिम सामन्यात तृतीय वर्षातील Electronics and Telecommunication इंजीनियरिंगच्या संघाने द्वितीय वर्षातील Mechanical इंजिनिअरिंग संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
बुद्धिबळ- या स्पर्धेत विद्यार्थी गटामधून विजेता चरण मामडी (ME4K) व उपविजेता समर्थ अरवत (CO2K) तसेच विद्यार्थिनी गटामधून विजेती श्वेता जेरबंदी (EJ6I) व उपविजेती विनीला विडप (EJ6I) हे ठरले.
बॅडमिंटन- बॅडमिंटन स्पर्धेत विद्यार्थी गटामधून विजेता मोनेश मेरगु (CO6I) व उपविजेता प्रणव नीलवाणी (CO6I) तसेच विद्यार्थिनी गटामधून विजेती विद्या सुतार (CO6I) व उपविजेती विनीला विडप (EJ6I) हे ठरले.
हॉलीबॉल- या स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये प्रथम विजेता हा CO6I चा वर्ग व द्वितीय विजेता EJ6I चा वर्ग हा ठरला.
कॅरम- विद्यार्थी सिंगल खेळामध्ये प्रथम विजेता प्रणव नीलवाणी (CO6I) व द्वितीय विजेता सिद्धार्थ सन्नके (CO2K) हे ठरले.
विद्यार्थिनी सिंगल खेळामध्ये प्रथम विजेती पूजा सोमवंशी (CO6I) तर द्वितीय विजेती मनीषा सलगर (CO2K) हे ठरले.
विद्यार्थी डबल मध्ये प्रथम विजेते समर्थ रुपनुरे (ME6I)व संकेत दोडतळे (ME6I) तसेच द्वितीय विजेते समर्थ सुरपुरे (EJ6I)व बालाजी कोकुल (EJ6I) हे ठरले.
विद्यार्थिनी डबल मध्ये प्रथम विजेते विनिला विडप (EJ6I) व श्वेता जेरबंदी (EJ6I) तसेच द्वितीय विजेते यशश्री बिज्जा (EJ6I) व नंदिनी पोटाबत्ती (EJ6I) हे ठरले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा समन्वयक प्रा. नागेश मेहत्रे व तसेच प्रा. निखिल दुधगी, प्रा.रोहिणी व्हनकस्तुरे, समीर जमादार, नबील डफेदार, शाहिद शेख, शैला शिंदे, शैलेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.